रत्नागिरी : गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येनं ट्रेन उपलब्ध केल्यानं कोकणात जाणा-या भाविकांना प्रवास सुखाचा वाटला. पण आता परतीच्या प्रवासात या प्रवाशांना पुन्हा प्रभू आठवायला लागेले आहेत. अत्यंत वाईट परिस्थितीत प्रवास करावा लागतोय. रेल्वे प्रशासन आणि आरपीएफच्या नियोजनशुन्यतेमुळे प्रवाशांवर ही वेळ आली आहे.
गणेशोत्सव काळासाठी खास सोडलेल्या गाड्यांचे दरवाजेच उघडले जात नसल्यानं प्रवाशांचे हाल झाले. या परिस्थिती आरपीएफ मात्र फक्त बघ्याची भूमिका घेतंय. रत्नागिरी स्थानकात मुंबईकडे येणा-यांची गर्दी वाढत चाललीय. त्यात सिंधुदुर्गाहून येणा-या गाड्या आधीच भरून येत असल्यानं बोगीचे दरवाजेच उघडले जात नाहीये. हतबल होऊन ही परिस्थिती पाहणे आणि मुंबईकडे येण्यासाठी पर्यायी गाडी शोधणे अशी अवस्था या चाकरमान्यांची झाली आहे.