कोल्हापूर: कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवीला अखेर अटक झालीये. लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या माळवी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगून रुग्णालयात गेली होती. गेले ३ दिवस या कारणानं तिनं अटक टाळली होती.
काल तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. आज रुग्णालयातून जिस्चार्ज मिळताच माळवीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केलीये. सध्या तिची चौकशी सुरू आहे.
तृप्ती माळवीला आपल्या पीएकरवी सोळा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं. पण त्यानंतर अटक टाळण्यासाठी तिनं लगेच रुग्णालयात धाव घेतली.
सर्वांना समान न्याय, गुन्ह्याचे गंभीर स्वरुप आणि तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तर माळवींना दोन लहान मुलं असल्यानं आणि तपासात त्या सहकार्य करत असल्यानं त्यांना जामीन मिळावा असा युक्तीवाद महापौरांच्या वकिलांनी केला होता. दोन्ही बाजू ऐकून घेत अखेर न्यायालयानं महापौरांचा जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर आज तिला अटक झाली असून एसीबीकडून चौकशी सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.