कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय. तृप्ती माळवी सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, उद्या त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
तृप्ती माळवींना आपल्या पीएकरवी सोळा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्यांनी अटक टाळण्यासाठी लगेच रुग्णालयात धाव घेतली. अद्यापही त्या रुग्णालयातच आहेत. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी वकिलांकरवी जोरदार प्रयत्न चालवले होते. पण जिल्हा सत्र न्यायालयानं आज अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय.
जामीन अर्ज फेटाळल्याने माळवींना आता अटक होणार हे नक्की आहे. सर्वांना समान न्याय, गुन्ह्याचे गंभीर स्वरुप आणि तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तर माळवींना दोन लहान मुलं असल्यानं आणि तपासात त्या सहकार्य करत असल्यानं त्यांना जामीन मिळावा असा युक्तीवाद महापौरांच्या वकिलांनी केला होता. दोन्ही बाजू ऐकून घेत अखेर न्यायालयानं महापौरांचा जामीन अर्ज फेटाळला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांना अटक करणार असल्याचं एसीबीच्या अधिका-यांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.