नागपूर : गुरुवारी अपहरण झालेल्या चैतन्य अष्टणकरची तब्बल ३६ तासांनंतर सुखरुप सुटका झालीय.
५० लाखांच्या खंडणीसाठी चैतन्यचं अपहरण करण्यात आलं होतं. त्याच्या सुटकेसाठी करण्यात आलेल्या नागपूर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं. नागपूरच्या मनीष नगर परिसरातून चैतन्यचं अपहरण करण्यात आलं होतं.
खापा परिसरातील एका खोतील त्याला डांबून ठेवण्यात आलं होतं. मात्र, चारही आरोपी दारु पिऊन झोपलेले असताना चैतन्यनं खोलीतून पळ काढला. चैतन्यच्या सुटकेनंतर त्याच्या घरात खरोखरीच नवचैतन्य अवतरलंय. कसा होता त्याच्या सुटकेचा थरार ऐकूयात खुद्द चैतन्यच्याच तोंडून...