अखेर वाद मिटला... सिद्धेश्वर यात्रेला मुहूर्त मिळाला!

सोलापुरातल्या सिद्धेश्वर यात्रेला अखेर मुहूर्त मिळालाय. येत्या ११ जानेवारीला यात्रा सुरू होतेय. आदर्श आपात्कालीन आराखडा वाद मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर सुटलाय. मनोरंजनात्मक नगरीच्या उभारणीला सुरुवात झालीय.

Updated: Jan 9, 2016, 01:06 PM IST
अखेर वाद मिटला... सिद्धेश्वर यात्रेला मुहूर्त मिळाला!   title=

संजय पवार, सोलापूर : सोलापुरातल्या सिद्धेश्वर यात्रेला अखेर मुहूर्त मिळालाय. येत्या ११ जानेवारीला यात्रा सुरू होतेय. आदर्श आपात्कालीन आराखडा वाद मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर सुटलाय. मनोरंजनात्मक नगरीच्या उभारणीला सुरुवात झालीय.

सिद्धेश्वर यात्रा जिल्हा प्रशासन आणि सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या वादात अडकली होती. पण मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर यात्रेला मुहूर्त मिळालाय. खरंतर यात्रा १५ डिसेंबरपासून सुरू होणार होती. पण आता ही यात्रा ११ जानेवारी सुरू होतेय.

आदर्श आपात्कालीन आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी स्थिगिती दिली. त्यामुळं पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनेच ही यात्रा सुरू होतेय. ६० लाखांचा खर्च करून प्रशासनानं रस्ता बनवला. तोच रस्ता या यात्रेत खोडा ठरला होता. तोच रस्ता या यात्रेसाठी वापरण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आणि वाद मिटला.... यात्रा उशिरानं का होईना पण सुरू होतेय हे जास्त आनंददायी आहे असं मंदीर समितीचे सचिव गुंडप्पा कारभारी यांनी म्हटलंय.

आता डिसंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच यात्रेची तयारी सुरू व्हायची यावर्षी मात्र ती आता सुरू झालीय. त्यामुळ ती लगबग जास्तच दिसतेय. दुष्काळ आणि वाद यामुळं आता यात्रा १५ दिवसांवर येऊन ठेपलीय. त्यामुळं व्यापारावर परिणाम होईल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे....

परंतु, वादानंतरही यात्रेला गालबोट न लागता यात्रा सुरू होतेय हे जास्त महत्त्वाचं...