मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्स बार सुरु करण्याला परवानगी मिळालीय. पण, डान्स बारमध्ये जाऊन डान्स करणाऱ्या महिलांसोबत असभ्य वर्तवणूक करणाऱ्यांची मात्र आता खैर नाही.
महाराष्ट्र सरकार एक असा कायदा आणण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे, बार डान्सरही निर्धास्त राहू शकतील. कोणत्याही बार डान्सरला हात लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना 6 महिन्यांची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
हीच शिक्षा त्यांच्यासाठीही असेल जे बार डान्सवर पैसे फेकतील... मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात यासंबंधी ड्राफ्टवर एक बैठकही घेतली. हा गुन्हा अजामीनपात्र असावा, अशीही यात तरतूद करण्यात आलीय.