नाशिक : शहरात आज तापमानाचा पारा सहा अंशावर आला आहे, तर जिल्ह्यात पाच अंशापर्यंत नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात पहाटेपासून धुक्याची दुलई पसरली होती. गोदावरी काठावर असलेल्या नवश्या गणपती परिसरात जणू काही ढग खाली आले होते.
जॉगर्सने या धुक्याचा मनमुराद आनंद लुटला. प्रवाहात कनयोकिंग खेळाच्या सराव करणाऱ्या खेळाडूंना धुक्याने चांगलेच वेढले होते. गंगापूर रस्त्यावरून ते थेट धरणापर्यंत धुक्याचा अंमल असल्याने नाशिकचे हिल स्टेशन झाले होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पाट्यांमुळे गेल्या चोवीस तासात थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे.