घरातली अशी एक घटना चिमुकल्याचा जीव घेऊ शकते

मात्र सावधान हि फॅशन कुटुंबीयांचा जीव घेऊ शकते नाशिकमध्ये  एक घरातील अपघातात चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 10, 2017, 11:47 PM IST
घरातली अशी एक घटना चिमुकल्याचा जीव घेऊ शकते title=

नाशिक : आजकाल घरामध्ये काचेचे दरवाजे फर्निचर आणि पार्टिशन करण्याची फॅशन आली आहे. मात्र सावधान हि फॅशन कुटुंबीयांचा जीव घेऊ शकते नाशिकमध्ये  एक घरातील अपघातात चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

(हा व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

नाशिकच्या धात्रक फाटा परिसरात राहणाऱ्या केशव पवळे यांचा हा चार वर्षीय मुलाचा फोटो  घरात खेळताना गँलरीला लावलेल्या  काचेच्या दरवाजावर साईश हा चार वर्षाचा चिमुरडा धडकला. त्याचा धडकेन दरवाज्याची काच फुटली आणि साईश च्या पोटात घुसली. 

रक्तबंबाळ झालेल्या चिमुरड्याला जवळच्याच खाजगी रुग्णालयात दाखल करणायत आलं. मात्र पोटाची जखम खोलवर असल्याने साईशचे प्राण वाचू  शकले नाहीत.

दरवाजावर धडकल्याने मोठा आवाज झाला त्यानंतर परिसरातील नागरिकांनी धावाधव करून पवळे यांच्या घराकडे धाव घेतली. त्याच वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले मात्र ते व्यर्थ ठरले. 

काचेचा पारदर्शक दरवाजा लक्षात आला नसल्याने साईश त्यावर जाऊन धडकल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे घराचे फर्निचर करताना दिखावू, आकर्षक फर्निचर करण्या एवजी टिकावू फर्निचर  केले असते तर चिमुरड्याचे प्राण वाचू शकले असते अशी हळहळ व्यक्त होतेय.