ठाण्यात राष्ट्रवादीत तीव्र नाराजी, तटकरेंची सारवासारव

येथील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी आहे. मात्र, असं काहीही नाही, अशी सारवासारव प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना करावी लागली.

Updated: Jan 13, 2016, 11:14 AM IST
ठाण्यात राष्ट्रवादीत तीव्र नाराजी, तटकरेंची सारवासारव title=

ठाणे : येथील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी आहे. मात्र, असं काहीही नाही, अशी सारवासारव प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना करावी लागली.

राज्यस्तरिय कब्बडी स्पर्धेसाठी आलेल्या प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला मंगळवारी २३ नगरसेवक अनुपस्थित होते.  पण नगरसेवकांमध्ये अशी कुठलही भावना नसल्याचं कार्यक्रमानंतर सुनील तटकरेंनी म्हटलंय. 

दोन दिवसांपासून सूरज परमार आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादी नगरसेवक नजीब मुल्ला आणि हनमंत जगदाळे यांना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याची नगरसेवकाची तक्रार आहे. यासंदर्भात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी कोणतीही पाऊले उचलली नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणं आहे.