मध्यप्रदेश जेलमधून फरार झालेले अतिरेकी जळगावात वास्तव्यास?

 मध्यप्रदेशातल्या जेलमधून फरार झालेले सिमी या प्रतिबंधित अतिरेकी संघटनेचे ५ अतिरेकी जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यासाठी दहशतवाद विरोधी पथकानं नुकतीच जळगावात येऊन चौकशी केल्याचं समजतंय.

Updated: Dec 12, 2014, 04:44 PM IST
मध्यप्रदेश जेलमधून फरार झालेले अतिरेकी जळगावात वास्तव्यास? title=

जळगाव : मध्यप्रदेशातल्या जेलमधून फरार झालेले सिमी या प्रतिबंधित अतिरेकी संघटनेचे ५ अतिरेकी जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यासाठी दहशतवाद विरोधी पथकानं नुकतीच जळगावात येऊन चौकशी केल्याचं समजतंय.

ही चौकशी इतकी गोपनीय होती की पोलीस अधीक्षकांसह स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. मध्य प्रदेशातल्या खंडवा जेलमधून अमजद रमजान, अस्लम अय्युब, जाकीर बदरूल, मोहम्मद एजाजउद्दीन तसच गुड्डू उर्फ शेख मेहबूब हे पाच अतिरेकी २०१३ साली फरार झाले होते.

पाकिस्तानी गुप्तचर ISIनं या अतिरेक्यांना घातपाती कारवायांचे आदेश दिल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असताना हे पाच जणांचं जळगाव कनेक्शन उघड झालंय.  हे पाचही आरोपी जळगावमार्गे औरंगाबाद पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या पाच जणांपैकी गुड्डू उर्फ शेख मेहबूब याचा मामा मुक्ताईनगरचा असल्यानं याची शक्यता बळावलीये. दरम्यान, रेल्वेच्या भुसावळ विभागाला अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.