मी संघाचा स्वयंसेवक – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच नागपूर भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन घेतलं..

Updated: Nov 3, 2014, 05:21 PM IST
मी संघाचा स्वयंसेवक – मुख्यमंत्री फडणवीस title=

नागपूर : मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच नागपूर भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन घेतलं..

संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या समाधीस्थळालाही मुख्यमंत्र्यांची भेट दिली आणि आदरांजली वाहिली.. राष्ट्रवादाची प्रेरणा देणारी ही भूमी असून आज परमपूज्य डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतांना एक स्वयंसेवक म्हणून मला एक वेगळीच अनुभुती होते आहे असा अभिप्रायही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या संदेश पुस्तकात नोंदवला आहे.

 मी संघाचा स्वयंसेवक आहे, संघाने शिकवण दिली म्हणून आदर व्यक्त करण्यासाठी आपण गोळवलकर गुरुजी आणि डॉ. हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन घेतलं असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन आपलं सरकार काम करेल अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.