नागपूर : हिट अॅंड रन प्रकरणात सलमान खानची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आल्याने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, सलमान प्रकरणी दोन दिवसांत अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात जाण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली.
अधिक वाचा : सलमान खानची निर्दोष सुटका - हायकोर्टाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत हाती आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे न्यायालयाने काय निकाल दिला आहे, याचा अभ्यास करून त्यानंतरच राज्य सरकार पुढे काय करायचे याचा निर्णय घेईल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलेय.
अधिक वाचा : निकाल ऐकताच सलमान हमसून हमसून रडला!
हिट अॅंड रन प्रकरणात सलमान खानवर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांतून उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर राज्य सरकारकडून या दोन्ही मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. उच्च न्यायालयाने काय निकाल दिला आहे, याची प्रत आम्हाला मिळालेली नाही. त्याची प्रत मिळाल्यावर त्याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर गरज वाटल्यास या प्रकरणी राज्याच्या महाधिवक्त्यांचा सल्ला मागविण्यात येईल आणि त्यानंतर सरकार सर्वोच्च न्यायालयात जायचे की नाही, याचा निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.