मानपाडा येथे प्रेम प्रकरणातून बारबालेचा खून

डोंबिवली मानपाड़ा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दावडी गावात राहणाऱ्या तरुणाने बारबाला असणाऱ्या प्रेयसीचा खून केल्याचं उघड झाले आहे. हत्या करून तरूणानं तिचा मृतदेह १६० किलोमीटर दूर भीमाशंकरच्या जवळच्या खांडस गावत जाळण्यात आला होता.

Updated: Dec 10, 2015, 04:13 PM IST
मानपाडा येथे प्रेम प्रकरणातून बारबालेचा खून title=

डोंबिवली : डोंबिवली मानपाड़ा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दावडी गावात राहणाऱ्या तरुणाने बारबाला असणाऱ्या प्रेयसीचा खून केल्याचं उघड झाले आहे. हत्या करून तरूणानं तिचा मृतदेह १६० किलोमीटर दूर भीमाशंकरच्या जवळच्या खांडस गावत जाळण्यात आला होता.

पोलिसांना खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार कारवाई करून हा रहस्यमय गुन्ह्याचा छडा लावला. याप्रकरणी प्रमुख आरोपी जयेश पाटिलला अटक करण्यात आलीय. जयेश आणि मृत मुलीचे प्रेम संबंध होते. जयेशला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण मुलीचे अन्य पुरुषांशी संबंध असल्याचं लक्षात आल्यावर जयेश आणि त्या मुलीचं जोरदार भांडण झालं. त्यातूनच जयेशनं धारदार शस्त्राने वार करून तिला ठार केले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पाहा व्हिडिओ :

.

 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.