शेतात सापडलं नवव्या शतकातलं हेमाडपंथी मंदिर

शेतात खोदकाम करताना हेमाडपंथी मंदिर सापडलंय. नांदेड जिल्ह्यातल्या कंधारमध्ये हे मंदिर सापडलंय. 

Updated: Feb 28, 2017, 05:14 PM IST
शेतात सापडलं नवव्या शतकातलं हेमाडपंथी मंदिर title=

नांदेड : शेतात खोदकाम करताना हेमाडपंथी मंदिर सापडलंय. नांदेड जिल्ह्यातल्या कंधारमध्ये हे मंदिर सापडलंय. 

मानसपुरीमध्ये भगवान मानसपुरे यांच्या शेतात सपाटीकरणाचं काम सुरू होतं. त्यावेळी खोदकाम करताना दगडी शिळा आढळल्या. आणखी खोदकाम केल्यावर मंदिर निदर्शनासं आलं.

रचनेवरून हे मंदीर इसवी सन नवव्या शतकातलं असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसेही कंधार शहराला ऐतिहासिक वारसा आहे. या शहरावर राष्ट्रकूट, यादव, काकतीय या राजघराण्यांचं राज्य होतं. मध्यकाळात इथे बहमनी, मुगल, निझाम आणि मराठ्यांनीही राज्य केलंय. तसंच सुफी संतांचही ही वास्तव्य होतं.

भूईकोट किल्लाही कंधारमध्ये आहे. राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण यानं ईसवी सन 758 मध्ये किल्ला बांधल्याचा इतिहास आहे. 

आता हे हेमाडपंथी मंदीर आढळल्यानं वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जातायत. शिवाय पुरात्तव विभागानं याबाबत संशोधन करण्याची मागणीही जोर धरतेय.