रत्नागिरी : कोकणाला सध्या पावसाने झोडपले असून समाधानकारक पाऊस पडत आहे. मात्र यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.
या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे नुकसान देखील होत आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या विचार केला तर दरवर्षी एकाच ठिकाणी खड्डे पडण्याचं प्रमाण पहायला मिळतं.. मुंबई-गोवा महामार्गावरील उक्षी, कुरधुंडा, संगमेश्वर, परशुराम घाट, वेरळघाटी याच ठिकाणी दरवर्षी खड्डे पडतात.
महामार्गावर अथवा इतर मार्गांवरील खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी पावसाळी डांबराचा वापर केला जातो. आणि त्यासाठी लाखो रूपयांचा खर्च देखील यावर्षी देखील हे खड्डे जुलैच्या पहिल्या आठवड्यात बुजवण्यात आले होते मात्र पुन्हा या खड्ड्यांनी डोकं वर काढले आहे. त्यातच जिथे नेहमी खड्डे पडतात तिथे फ्लेवरब्लॉक बसवण्याचं काम सुरू करण्यात आलं त्यामुळे पुन्हा लाखो रूपये शासनाचे खर्ची घातले जात आहेत. मात्र, खड्ड्यांनी डोके वर काढल्याने वाहनचालक हैराण झालेत.