कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौरपदी पहिली मुस्लीम महिला महापौर विराजमान झालीय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसिना बाबू फरास यांची महापौरपदी निवड करण्यात आलीय. हसिना फरास यांना ४४ तर भाजप आणि ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांना ३३ मतं मिळाली.
शिवसेनेचे चार नगरसेवक गैरहजर राहिले तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अर्जुन माने यांची निवड करण्यात आली.
कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका मुस्लिम महिलेला महापौर बनण्याचा मान मिळालाय.