नाशिक : जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील गोदामातून तब्बल 30 हजार क्विंटल धान्य गायब झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर प्रशासनाची झोपच उडालीय.
पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी आदिवासींचे धान्य पळवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडल्याचं वृत्त 'झी 24 तास'नं दाखवलं होतं. रेशनिंगवर वाटपासाठीचे धान्य अधिकाऱ्यांनीच गायब केलंय. त्यामळे सर्व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांविरोधात शासनाने एफआयआर दाखल केलीय.
सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशी करण्याचे विभागाच्या सचिवांनी आदेश दिले असून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
त्याशिवाय दोषी अधिकाऱ्यांकडून गायब झालेल्या धान्याचे पैसेही वसुल करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.