निराधार महिला गेली ८ वर्षे सहन करतेय गावकीचा जाच

रायगड जिल्ह्यातील वडघर इथल्या रसिका मांडवकर ही निराधार महिला गेली ८ वर्षे गावकीचा जाच सहन करते आहे.

Updated: Feb 4, 2015, 10:39 AM IST
निराधार महिला गेली ८ वर्षे सहन करतेय गावकीचा जाच  title=

रायगड: रायगड जिल्ह्यातील वडघर इथल्या रसिका मांडवकर ही निराधार महिला गेली ८ वर्षे गावकीचा जाच सहन करते आहे.

वाडी इथल्या रसिका मांडवकर यांच्या कुटुंबाला गावकीनं क्षुल्लक कारणावरुन वाळीत टाकलंय. तेव्हापासून रसिकाचे पति रमेश बेपत्ता आहेत रसिका यांना गाव सोडावं लागलंय. मुंबईत राहून घरकाम करून गावकीनं ठोठावलेला १० हजार रुपयांचा दंडही त्यांनी भरला. आता त्यांनी गावात नवं घर बांधायला घेतलं तर तिथंही ग्रामस्थांनी त्यांना विरोध सुरु केलाय. 

२६ जानेवारीला झालेल्या बैठकीत, घर गावकीच्या नावावर करुन देण्याची अचाट मागणी करण्यात आलीये. त्याला मांडवकर यांनी विरोध करताच गावानं त्यांना बाहेर काढलं. रसिका यांचे नातेवाईक त्यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून, त्यांनाही गावानं धमकी दिलीये. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष घातलं असलं तरी काही घडल्याचं गावकऱ्यांनी मात्र नाकारलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.