गोकुळ दूध संघावर आमदार महाडिक पॅनलची सरसी

गोकुळ दूध उत्पादक संघावर पुन्हा एकदा आमदार महादेवराव महाडिक यांच्या पॅनलची सरशी झालीय. 

Updated: Apr 24, 2015, 06:50 PM IST
गोकुळ दूध संघावर आमदार महाडिक पॅनलची सरसी title=

कोल्हापूर : गोकुळ दूध उत्पादक संघावर पुन्हा एकदा आमदार महादेवराव महाडिक यांच्या पॅनलची सरशी झालीय. 

महाडिक यांच्या राजर्षी शाहू सत्ताधारी पॅनलनं १६ जागा पटकावत विजय मिळवला. तर राजर्षी परिवर्तन पॅनलला केवळ २ जागा मिळाल्या. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणात गोकुळ दूध संघावर असलेल्या वर्चस्वाला वेगळंच राजकीय महत्व आहे. 

कोट्यवधींची उलाढाल आणि कार्यकर्त्यांची राजकीय सोय लावण्यासाठीची हक्काची जागा म्हणून गोकुळ दूध संघाकडे अनेक नेते पाहतात. त्यामुळंच या शक्तीस्थळावर वर्चस्व ठेवण्यासाठी जिल्ह्यातले दिग्गज नेते प्रयत्न करतात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.