ठाणे: 'ग्लोबल कपल 2015' म्हणून जगभर नेट युजर्समध्ये लोकप्रिय ठरलेले दाम्पत्य सतीश आपटे आणि अमृता आपटे यांच्या वैवाहिक आयुष्यावर अवघ्या सहाच महिन्यात आघात झालाय. बहुचर्चित नववधू हरविल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.
मुंबईतील जाहिरात उद्योगपती गोकुळदास कपाडीया यांची नात लिसा कपाडीया यांचा विवाह त्यांचे वडील आणि बहिणीच्या पुढाकारानं व्यवसायानं पत्रकार असलेले 58 वर्षीय सतिश आपटे यांच्याशी 1 जानेवारीला थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला होता. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध वेबसाईट्सनं सर्वाधिक लोकप्रिय ग्लोबल कपल म्हणून त्यांचा उल्लेख केला.
सर्वकाही गुण्यागोविंदानं सुरू असतांना अचानक नववधू अमृता आपटे सासरहून माहेरी जात असल्याचं सांगून गेल्यात पण अजूनही त्या घरी परतल्या नाहीत. त्यांच्या सासूबाई प्रमिला आपटे आणि पती सतीश आपटे यांना या प्रकारामुळं जबर धक्का बसलाय.
आपटे यांचा हा प्रेम विवाह होता. लग्न झाल्यानंतर हे जोडपं सुखानं संसार करत होतं पण 6 महिन्यांनतर अचानक अमृता गायब झाल्यानं ठाण्यात खळबळ उडालीये. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.