शाळेत विद्यार्थिनींचे शोषण झाल्याची घटना उघडकीस

नागपूरच्या कोराडी भागातील तुली पब्लिक स्कूलमधील ही घटना आहे. शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा शाळेतल्या कर्मचा-याने विनयभंग केल्याचा आरोप आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 7, 2017, 09:28 PM IST
शाळेत विद्यार्थिनींचे शोषण झाल्याची घटना उघडकीस title=

नागपूर : बुलढाणा, यवतमाळच्या पाठोपाठ नागपूरच्या एका शाळेत विद्यार्थिनींचे शोषण झाल्याची घटना उघडकीस आलीय. नागपूरच्या कोराडी भागातील तुली पब्लिक स्कूलमधील ही घटना आहे. शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा शाळेतल्या कर्मचा-याने विनयभंग केल्याचा आरोप आहे. 

या प्रकरणी संबंधित शाळेने माहिती दडवल्याचा आरोप होत असून, मुलींनी आपबिती सांगितल्या नंतर पोलिसांनी कारवाई केली असून आरोपीला अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे याबद्दल संबंधित शाळेने कुठलीही माहीत दिली नसल्याने शाळेच्या व्यवस्थापनाचा यामागे काय हेतू आहे हा प्रश्न विचारला जातोय.