अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन

जलसंपदा घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्या सह चार ठेकेदार यांचीही नार्को टेस्ट घ्या. त्यामुळे कोणत्याही चौकशीची गरज नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रति आव्हान दिले आहे. 

Updated: Jan 1, 2015, 06:38 PM IST
अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन title=

जळगाव : जलसंपदा घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्या सह चार ठेकेदार यांचीही नार्को टेस्ट घ्या. त्यामुळे कोणत्याही चौकशीची गरज नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रति आव्हान दिले आहे. 

गिरीश महाजन यांना १०० कोटींची ऑफर आली होती. ऑफर देणाऱ्यांची नावे उघड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली होती. तसेच महाजन नाव उघड करत नसतील तर त्यांची नार्को चाचणी करा असा वार केला होता. 

त्यावर पलटवार करत गिरीश महाजन यांनी मलिक यांचे चॅलेंज स्वीकारले आणि या प्रकरणी माजी दोन जलसंपदा मंत्री आणि चार कॉन्ट्रॅक्टर आणि चार ठेकेदारांची मी नावे सांगतो, त्यांची नार्को चाचणी करा. मग पोलिस चौकशी आणि इतर गोष्टी करण्याची गरज नाही. उद्या मी मुंबईला जाणार आहे. तर मग माझ्यासह इतरांची नार्को चाचणी करावी असे खुले आव्हान राष्ट्वादीला गिरीश महाजन यांनी दिले आहे. 

विद्यमान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत सनसनाटी गौप्यस्फोट केला होता... आघाडी सरकारमधील जलसंपदामंत्र्यांनी प्रचंड घोटाळे केले. त्यांना 20 ते 22 टक्के कमिशन दिले जात असल्याचा आरोप महाजन यांनी केलाय... 

जलसंपदा खात्यातील टक्केवारीचा पर्दाफाशच महाजन यांनी केल्यानं एकच खळबळ उडालीय... येत्या आठवड्यात जलसंपदा खात्यातील आणखी अनेक घोटाळे उघड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माजी जलसंपदामंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांची याआधीच एसीबीमार्फत चौकशी करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिलीय.. 

आता नवे घोटाळे उघड झाल्यास ते आणखी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जातेय...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.