पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार

येथील फर्ग्युसन रोडवर एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार अज्ञाताने केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर मोटारसायकलवरुन पसार झाला.

Updated: Dec 22, 2015, 10:02 PM IST
पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार title=

पुणे : येथील फर्ग्युसन रोडवर एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार अज्ञाताने केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर मोटारसायकलवरुन पसार झाला.

पोलीस कर्मचारी मयूर भोकरे याच्यावर गोळीबार करण्यात आला. मयूर आणि त्यांचा सहकारी संदेश खडके हे अॅक्टिवावरुन जात असताना सावरकर भवन परिसरात त्यांनी दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघा तरुणांपैकी एका तरुणाच्या कमरेला पिस्तूल लावल्याचे पाहिले. त्यविषयी त्यांना हटकलं असता हे तरुण पळून जाऊ लागले. 

त्यानंतर मयूर आणि त्यांचा सहकारी यांनी दोघांचा पाठलाग सुरु केला. फर्ग्युसन रस्त्यावरील पाटील बंगला परिसरात त्यांनी आरोपीना गाठले. या ठिकाणी आरोपी आणि पोलीस कर्मऱ्यांत झटपट झाली. त्यामध्ये आरोपीने मयूर यांच्यावर पायाच्या दिशेने गोळी झाडली. 

मात्र, मयूरला गोळी लागली नाही. त्यानंतरही आरोपीला रोखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखून आरोपी फरार झाले. याबाबत डेक्कन पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय.