पुण्यात गुंड अप्पा लोंढे याची हत्या

कुप्रसिध्द गुंड आप्पा तथा प्रकाश हरीभाऊ लोंढे (४८) याचा आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरानी रिव्हॉल्वर मधून गोळ्या घालून हत्या केली. ही घटना लोंढे मॉर्निग वॉकसाठी जात असताना घडली.

Updated: May 28, 2015, 12:59 PM IST
पुण्यात गुंड अप्पा लोंढे याची हत्या title=

पुणे : कुप्रसिध्द गुंड आप्पा तथा प्रकाश हरीभाऊ लोंढे (४८) याचा आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरानी रिव्हॉल्वर मधून गोळ्या घालून हत्या केली. ही घटना लोंढे मॉर्निग वॉकसाठी जात असताना घडली.

अप्पा लोंढे याच्यावर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरानी धारधार हत्याऱ्यांच्या साह्याने अनेक वार केले. अप्पा लोंढेवर खून, खूनाचे प्रयत्न, जमीन लुबाडणूक या सारखे तब्बल पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत. 

दहा वर्षांपूर्वी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. अप्पा लोंढे याच्या घरापासून काही अंतरावर चालत जात असताना दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये गंभीर जखमी झाला. हल्लेखोर फरार झाले, अशी माहिती  लोणी काळभोर पोलिसांनी दिली. 

पोलिसांनी घटनास्थळावर गावठी पिस्तुलाची एक पुंगळी सापडली आहे. अप्पा लोंढे याची बारामती, हवेली, दौंडसह पुणे जिल्ह्यात दहशत होती. त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजितसिंह परदेशी यांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.