राज्यात पुरात चार जण वाहून गेलेत, चंद्रपूरमध्ये धरणाचे दरवाजे उघडले

राज्यात चांगला पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले. नाशिकमध्ये गादापात्रते पाणीवाढले. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याची गरज नाही. तर जळगावात पुरात चार जण वाहून गेलेत. चंद्रपूरमध्ये धरणाचे दरवाजे उघडावे लागेलत.

Updated: Sep 18, 2015, 04:00 PM IST
राज्यात पुरात चार जण वाहून गेलेत, चंद्रपूरमध्ये धरणाचे दरवाजे उघडले title=

मुंबई : राज्यात चांगला पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले. नाशिकमध्ये गादापात्रते पाणीवाढले. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याची गरज नाही. तर जळगावात पुरात चार जण वाहून गेलेत. चंद्रपूरमध्ये धरणाचे दरवाजे उघडावे लागेलत.

जळगाव जिल्ह्यात गणरायाच्या आगमनासोबतच मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीय. या पावसामुळे जामनेर तालुक्यात २५ वर्षीय महिलेसह दोघे विद्यार्थी पुराच्या पाण्यात वाहून गेले. जामनेर तालुक्यात एकाच रात्रीत सर्वाधिक ११६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलीय.

अधिक वाचा : बाप्पा पावला, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस

जोरदार पावसामुळे वाघुर, कांग, सोन या नद्यांना या पावसाळ्यातील पहिला मोठा पूर आलाय, नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय, तर फत्तेपूर मधील मदरशात शिकणारे दोघे विद्यार्थी कांग नदीच्या पुरात वाहून गेले, त्यांचा शोध सुरु आहे, हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे धरणाच्या ४१ पैकी २४ दरवाज्यांतून प्रतिसेकंद ५० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सुरु आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्वच सर्व १५ तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने खरीप हंगाम हातचा गेला असला तरी शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ३९६ मिलीमीटर एवढा पाऊस झालाय. 

धरणाचे तीन दरावजे उघडलेत, महिला वाहून गेली
चंद्रपूर येथील इरई धरणाचे सात पैकी ३ दरवाजे उघडल्याने इरई नदीने पाण्याची पातळी ओलांडली. पुरात एक महिला वाहून गेली असून काही गावांचा चंद्रपूर शहराशी असलेला थेट संपर्क तुटला चंद्रपूर जिल्ह्यात गेले ४८ तास झालेल्या संततधार पावसाने शहरालगतच्या इरई धरणाची ३ दारे उघडावी लागली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.   

अधिक वाचा : नाशिकमध्ये जोरदार पाऊस आणि कुंभनगरीत तिसरे शाहीस्नान

धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदी दुथडी भरून वाहत आहे. इरई नदी फुगल्यामुळे पठाणपुरा गेट मागे असलेला मार्ग पाण्याखाली गेलाय. या भागात एका महिला वाहून गेल्याची घटना घडल्याने बचाव पथकाने शोधकार्यास प्रारंभ केला. धरणाचे विवध मार्गावर आल्याने आरवट, चारवट, हडस्ती, शिवनी या सारख्या अनेक गावांचा चंद्रपूर शहराशी असलेला थेट संपर्क तुटलाय. या पावसाचा पिकांना फार फायदा होणार नसला तरी पिण्याच्या पाणीचे संकट मात्र दूर झाले आहे. येत्या २४ तासातही असाच पाउस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

औरंगाबादमध्ये पाण्याचा प्रश्न सुटणार
औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात पावसाचा चांगलाच जोर सुरु आहे. सिल्लोड तालुक्यातील खेळणा धरण आणि पालोद बंधारा पूर्णपणे भरला आहे. त्यामुळं १९ गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.. कालपर्यंत या बंधा-यात अवघा ४ टक्के पाणीसाठा होता मात्र  १५  तासांच्या पावसानं तो १०० टक्के झाला आहे, तर कन्नड तालुक्यात सुद्दा पावसाचा चांगलाच जोर आहे. 

कन्नड तालुक्यातील ब्राम्हणी  शिवना, आणि आंबाडी नदीला पूर आला आहे. तर अंबाडी मध्यम प्रकल्प अर्धा भरला आहे त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा सहा महिन्यांसाठी प्रश्न सुटला आहे. सर्वदूर असाच पावूस जिल्ह्यात सुरु आहे. त्यामुळं पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासोबत बळीराजालाही दिलासा मिळाला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.