रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात सध्या शिवसेनेत नाजाराजीचे सूर पाहायला मिळत आहे. संगमेश्वर तालुक्यातील नाराजीनंतर या नाराजीचे लोण आता दापोली तालुक्यातही पोहोचले आहेत. माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी नाराज असून पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या कार्यपद्धतीवर सूर्यकांत दळवी नाराज असून उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार निवड करताना तालुकाप्रमुख आणि उपतालुकाप्रमुख यांची कोंडी करून दिलेल्या लिस्टमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे दापोली शिवसेनेत नाराजी आहे. त्यामुळे दोन दिवसात आपला निर्णय सूर्यकांत दळवी जाहीर करणार असल्याचं झी 24 तासला सांगितले.