शहीद संजू खंडारे यांच्यावर अंत्यसंस्कार

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील माना येथील शहीद जवान संजू खंडारे यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Updated: Feb 1, 2017, 07:17 PM IST
शहीद संजू खंडारे यांच्यावर अंत्यसंस्कार  title=

अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील माना येथील शहीद जवान संजू खंडारे यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनात जवान संजू खंडारे शहीद झाले होते. माना गावातील जिल्हा परिषद शाळेलगतच्या मैदानात या वीराला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी मुर्तिजापूर तालुक्यातील हजारो नागरिक, राजकीय नेते, प्रशासन, पोलीस आणि लष्करातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

संजू यांच्या पार्थिवाला त्यांच्या चार वर्षीय मुलगा आणि वडिलांनी मुखाग्नी दिला. संजू हे 2005-06मध्ये सैन्यामध्ये भरती झाले होते. ते जम्मू-काश्मिरमध्ये 13 महार बटालियनमध्ये कार्यरत होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, सात वर्षीय़ मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा आहे.