माजी राष्ट्रपतींच्या भावाला हत्येप्रकरणी आरोपी करण्याचे आदेश

जळगाव काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्राम पाटील हत्याप्रकरणात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे बंधू गजेन्द्रसिंग पाटील आणि काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना आरोपी करण्याचे आदेश सोमवारी जिल्हा कोर्टाने दिले आहेत. यामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, दिवंगत प्रा. पाटील यांच्या पत्नी प्रा. रजनी पाटील यांच्या आठ वर्षांच्या लढ्याला यश आलं आहे.

Updated: Jul 8, 2014, 01:41 PM IST
 माजी राष्ट्रपतींच्या भावाला हत्येप्रकरणी आरोपी करण्याचे आदेश title=

जळगाव: जळगाव काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्राम पाटील हत्याप्रकरणात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे बंधू गजेन्द्रसिंग पाटील आणि काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना आरोपी करण्याचे आदेश सोमवारी जिल्हा कोर्टाने दिले आहेत. यामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, दिवंगत प्रा. पाटील यांच्या पत्नी प्रा. रजनी पाटील यांच्या आठ वर्षांच्या लढ्याला यश आलं आहे.

21 सप्टेंबर 2005 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष व्ही.जी.पाटील यांची चाकून भोसकून हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांमार्फत डॉ. उल्हास पाटील आणि गजेंद्र पाटील यांनी ही हत्याकांड घडवून आणल्याचा आरोप विश्राम पाटील यांच्या पत्नी प्रा. रजनी पाटील यांनी केला होता.

कोर्टाच्या निर्णयानंतर प्रा. व्ही. जी. पाटील खून प्रकरणी सीबीआयनं तपास चालू केला होता.  अखेर जळगाव न्यायालयानं या दोघांना सहआरोपी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळं आता व्ही.जी. तात्या पाटील यांच्या हत्याप्रकरणी माजी राष्ट्रपतींचे बंधू गजेंद्र पाटील आणि माजी खासदार उल्हास पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.