जालना : भारिप बहुजन महासंघाने राज ठाकरे यांच्यावर आरोप करताना म्हटलं आहे, 'अॅट्रॉसिटी कायदा' रद्द करण्याची मागणी राज ठाकरे केली, यावरून त्यांना संविधान मान्य नसल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे, यामुळे राज यांच्याकडून मागासवर्गीयांच्या भावना दुखावल्या आहेत.
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंवर अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा, अशी मागणी भारिपने केली आहे. तशी तक्रार भारिपने तालुका पोलिस स्टेशनमध्ये केली आहे.
बलात्कार करणाऱ्यांसाठी शरियतसारखे कठोर कायदे लागू करून बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे, तसेच अॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केलं होत.