पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये क्षेत्रीय सभेदरम्यान काँग्रेस नगरसेविकेला काँग्रेस नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी बदल्याची धक्कादायक घटना घडलीय. यामुळे शहरात एकच खळबळ उडालीय. दुसरीकड आधीच विविध गटा-तटामुळे अडचणीत आलेल्या काँग्रेसला या हाणामारीच्या प्रकरणामुळे आणखीन मोठा धक्का बसलाय!
फोटोत दिसणारी महिला आहे काँग्रेस नगरसेविका आणि महिला आणि बालकल्याण सभापती गीता मंचरकर… आणि ज्या महिला मंचरकर यांना मारहाण करत आहेत त्या काँग्रेसचेच नगरसेवक कैलास कदम आणि सद्गुरू कदम यांच्या कार्यकर्त्या असल्याचा आरोप आहे.
कैलास कदम आणि गीता मंचरकर या एकाच प्रभागातल्या असल्यामुळे दोघांमध्ये प्रचंड संघर्ष आहे. पण हा संघर्ष अशी पातळी ओलांडेल याची कोणालाच कल्पना नव्हती. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केलीय खरी पण या वादाचा परिणाम शहर काँग्रेसवर पडलाय. मुळातच विविध गटांमध्ये विखुरलेल्या काँग्रेसची प्रतिमा या घटनेमुळे अधिकच मलीन झालीय.
यावर, शहराध्यक्ष सचिन साठे यांनी मात्र या वादाचा पक्षावर काही परिणाम होणार नाही, असा दावा केलाय.
या प्रकरणात कायदेशीर कारवाई होईलही... पण लोकांचे प्रतिनिधी म्हणून वावरत असताना दोन नेत्यांमाधला हा संघर्ष एवढ्या टोकाला जात असेल तर नागरिकांनी अशा नगरसेवकांकडून काय अपेक्षा ठेवायची हा प्रश्नच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.