बापानेच केला २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार

बायको घरकाम करण्यासाठी बाहेर गेल्यानंतर आपल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्यावर बापानेच आळीपाळीने बलात्कार करण्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.

Updated: Apr 17, 2016, 08:45 PM IST
बापानेच केला २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार title=

उल्हासनगर : बायको घरकाम करण्यासाठी बाहेर गेल्यानंतर आपल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्यावर बापानेच आळीपाळीने बलात्कार करण्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.

बलात्कार करणाऱ्या या नराधम बापाला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून माणसातील माणुसकी हद्दपार होत असल्याची चर्चा सुरु आहे.