मुलीच्या कन्यादानाआधीच शेतकरी पित्याने जीवन संपवलं

दारात लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, श्रीमंतीचा थाटमाट तसा नव्हताच, पण लग्नसोहळ्याला गरीबीचं का असेना, आनंदाचं कोंदण होतं. अवधूत सातभाई यांच्या दोनही मुलींच्या लग्नाचा सोहळा २९ डिसेंबरला आहे. 

Updated: Dec 28, 2015, 06:05 PM IST
मुलीच्या कन्यादानाआधीच शेतकरी पित्याने जीवन संपवलं title=

बीड : दारात लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, श्रीमंतीचा थाटमाट तसा नव्हताच, पण लग्नसोहळ्याला गरीबीचं का असेना, आनंदाचं कोंदण होतं. अवधूत सातभाई यांच्या दोनही मुलींच्या लग्नाचा सोहळा २९ डिसेंबरला आहे. 

या शेतकरी माणसाने, पैशांची तजवीज करण्यास सुरूवात केली, पण पैसे काही जमले नाहीत, समाज काय म्हणेल, म्हणून अवधूत सातभाई घाबरले, अखेर या शेतकरी पित्याने मुलींना निरोप देण्याआधीच, गळफास घेत या जगाचा निरोप घेतला.

अखेर गाव धावून आलं...
पोरके झालेल्या या मुलींसाठी गावासह काही दानशूरांनी लोकवर्गणीतून १ लाख ५ हजार ५०० रुपये जमवले. आता नियोजित तारखेला परळी तालुक्यातील तडोळी हे गाव या मुलींचे कन्यादान करणार आहे.