बनावट नोटा छापणाऱ्या डॉक्टराला अटक

कोल्हापूर पोलीसांनी दोन हजार, शंभर आणि वीस रुपयांच्या नोटा छापणा-या डॉक्टराला जेरबंद केलय. पोलीसांनी डॉ. सुधीर कुंबळे या डॉक्टराला अटक करुन त्याच्याकडून नोटा छापण्यासाठी वापरलेल प्रटिंग मशिन जप्त केलय.

Updated: Dec 16, 2016, 07:19 PM IST
 बनावट नोटा छापणाऱ्या डॉक्टराला अटक  title=

कोल्हापूर  : कोल्हापूर पोलीसांनी दोन हजार, शंभर आणि वीस रुपयांच्या नोटा छापणा-या डॉक्टराला जेरबंद केलय. पोलीसांनी डॉ. सुधीर कुंबळे या डॉक्टराला अटक करुन त्याच्याकडून नोटा छापण्यासाठी वापरलेल प्रटिंग मशिन जप्त केलय.

 डॉ. सुधीर कुंबळे यानं स्वताच्या क्लिनीक आणि घरांमध्ये दोन हजार, शंभर आणि विस रुपयांच्या नोटा प्रिटींग मशीनवर छापत होता. त्यानंतर ह्या नोटा रस्त्यांवरील विक्रेत्यांना देवून ते खपवत होता. गुरुवारी हा डॉक्टर दोन हजार रुपयांची नोट एका विक्रेत्याला देत होता. 
 
 त्यावेळी या विक्रेत्याला संशय आल्यानं त्याना ही नोट घेण्यास नकार दिला, त्यामुळं डॉक्टर आणि विक्रेत्यामध्ये वाद झाला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कोल्हापूरातील लक्ष्मीपुरी पोलीसांनी या डॉक्टराला अटक करुन त्याच्याकडून दोन हजाराच्या सहा नोटा, शंभरच्या पाच नोटा आणि विस रुपयांच्या दहा नोटा जप्त केल्यात.

Tags: