नागपूर : मागसवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारकून मिळणाऱ्या 2154 कोटी रुपये परत गेल्याचा मुद्द्यावरून आज एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. झी मीडियानं केलेल्या बातमीच्या आधारे खडसेंनी सरकारला प्रश्न विचारला. एकीकडे विद्यार्थ्यांना दोन दोन वर्ष विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत, दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जात नाही.
केंद्रानं दिलेलं अनुदान परत जातं ही विसंगती मांडून खडसेंनी सरकारला घरचा आहे दिला. दरम्यान सरकारनं खडसेंच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. त्यामुळे या मुद्द्यावर सरकारमध्ये असणारा अंतर्गत गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.