नागपूर : (अखिलेश हळवे, झी मीडिया) नागपूरात नकली सेक्स रॅकेटच्या माध्यमातून अनेकांना गंडा घालणारी टोळी नागपूर पोलिसांनी पकडलीय. या टोळीची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावले आहेत. पाहूया हा विशेष रिपोर्ट
नागपूरच्या झिंगाबाई टाकळी या भागातील एका घरात, एक बोगस सेक्स रॅकेट राबवून अनेकांची फसवणूक सुरू होती.
या घरात राहणारी अलका ढोके नावाची महिला याची मास्टरमाईंड आहे. अलका आणि तिची टोळी ६० वर्षे वयोगटाच्या पुरूषांचा शोध घेत असे.
या पुरूषांना मसाजचं अमीष दाखवून या घरात आणलं जात असे.
तिथे खोलीत गेल्यावर काही वेळाने आत असलेली मुलगी बाहेर असलेल्या आपल्या साथीदारांना विशिष्ट संकेत देत असेल. संकेत मिळाल्यावर पोलिसांच्या वर्दीतले नकली पोलीस तिथे धाड मारत असंत.
अचानक पडलेल्या या धाडीने ती व्यक्ती गोंधळत असे. याचा फायदा ही टोळी घेत असे. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या बोगस पोलिसांकडे बनावट आयकार्डही होतं. पण आधीच घाबरलेलं सावज ते तपासूही शकत नसे.
अखेर या जाचातून सुटण्यासाठी त्याच्याकडे पैशांची मागणी केली जात असे. त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीनुसार त्याला ५० हजार ते ५ लाखांपर्यंत लुबाडलं जात असे.
आजवर ६९ जणांना लुबाडल्याची पोलिसांची माहिती आहे. विशेष म्हणजे या गोरखधंद्य़ाला एका पोलीस अधिका-याची आणि एका माजी सैनिकाचीही मदत असल्याची चर्चा आहे.
या प्रकरणी आत्तापर्यत ४ महिलांसह ९ जणांना अटक केलीय. मात्र अजूनही काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.