'बिग बॉस'ची नजर असल्याने एका दिवसात गाव शिस्तीत

उघड्यावर शौचाला बसणा-या गावक-यांना शिस्त लावण्यासाठी अमरावतीच्या सावंगा ग्रामपंचायतीनं अफलातून आयडिया केलीय.

Updated: Sep 3, 2015, 10:20 PM IST
'बिग बॉस'ची नजर असल्याने एका दिवसात गाव शिस्तीत title=

अमरावती : उघड्यावर शौचाला बसणा-या गावक-यांना शिस्त लावण्यासाठी अमरावतीच्या सावंगा ग्रामपंचायतीनं अफलातून आयडिया केलीय.

अमरावती जिल्ह्यातल्या सावंगा गावात आता कुणीही उघड्यावर शौचाला बसत नाही. कारण हागणदारीमुक्तीसाठी सावंगा ग्रामपंचायतीनं गावात चक्क सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत.

गावातील चौक, रस्ते आणि हगणदारीकड़े जाणाऱ्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. गावात सीसीटीव्ही लावल्यापासून लहान मोठ्या भानगड़ी, तंटे बंद झालेच. शिवाय गावातली स्वच्छता वाढली. आजारी पडणारांची संख्या एकदम कमी झाली.

विदर्भातली पहिली डिजीटल ग्रामपंचायत होण्याचा मान सावंगानं पटकावलाय. 2200 लोकसंख्या असलेल्या या गावात ई-लर्निग द्वारे शिक्षण, संगणकीकृत दाखले, सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प असे उपक्रम भविष्यात राबवण्याचा त्यांचा मानस आहे. गावातील युवा वर्गही या निर्णयामुळं आनंदी झालाय.

अस्वच्छता पसरवणारांवर कारवाई करण्याचे नियम आणि कायदे आहेत. मात्र त्याचा परिणाम दिसत नाही. नागरिकांना त्याचा धाक नव्हता. मात्र गावात सीसीटीव्ही बसवण्याची ही कल्पना चांगलीच यशस्वी ठरलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.