दुष्काळप्रश्नावर विरोधक आक्रमक, विधानसभा तहकूब

सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारला दुष्काळप्रश्नावर विरोधकांनी मंगळवारी चांगलेच धारेवर धरले. काँग्रेस आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत चर्चा करण्याऐवजी आधी दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करा, अशी मागणी केली.

Updated: Dec 12, 2014, 11:58 AM IST
दुष्काळप्रश्नावर विरोधक आक्रमक, विधानसभा तहकूब title=

नागपूर : सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारला दुष्काळप्रश्नावर विरोधकांनी मंगळवारी चांगलेच धारेवर धरले. काँग्रेस आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत चर्चा करण्याऐवजी आधी दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करा, अशी मागणी केली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत दुष्काळप्रश्नावर जोरदार हरकत घेतली. विरोधकांच्या गोंधळामुळे विधी मंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

नागपूरमध्ये सुरु असलेले हिवाळी अधिवेशनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दुष्काळावरुन सरकारवर टीका केली. सरकार दुष्काळाप्रश्नी गंभीर नसून ते फक्त राजकारण करीत आहे, अशी टीका दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली. तर विरोधकांनीच चर्चा करु दिली नाही, असा आरोप शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केला.

संध्याकाळी 5.56 वा

- काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन कायम

- विधानसभा अध्यक्ष आणि समिती बैठकीत निलंबन कायम ठेवण्याचा निर्णय

- राज्यपालांना धक्काबुक्की प्रकरणी झाले होते निलंबन, समिती राज्यपालांना भेटणार

दुपारी १.३० वा
- विधानसभेत सरकारी पक्षाकडून दुष्काळावर चर्चा सुरू
- तर चर्चा ही विरोधकांच्या स्थगन प्रस्थावावर सुरु व्हायला हवी होती, अशी विरोधकांनी मागणी केली
- चर्चेआधीच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची विरोधकांची मागणी

- विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
- विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधला गोंधळ कायम 

दुपारी : १.०० वा
- विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात
- विरोधकांचा गदारोळ आणि घोषणाबाजी सुरू

दुपारी १२.३० वा.
- विरोधकांच्या गोंधळामुळे विधानपरिषदेचं कामकाज १.०० वाजेपर्यंत तहकूब
- विधानसभेचंही कामकाज तहकूब... सकाळपासून विधानसभा तिसऱ्यांदा तहकूब

दुपारी १२.०० वा.
- विधानपरिषद कामकाज पुन्हा सुरू होताच काँग्रेस - राष्ट्रवादीचा गोंधळ सुरू 
- विधानसभेचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब 

सकाळी ११.३५ वा.
- वेलमध्ये घुसून विधानसभेतचं विरोधकांचं ठिय्या आंदोलन
- ठिय्या आंदोलनात बाळासाहेब विखे पाटील, बाळासाहेब थोरात, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांचा सहभाग

सकाळी ११.३० वा.  
- विधानपरिषद कामकाज ३० मिनिटांकरता तहकूब
- दुष्काळ आणि आत्महत्या संदर्भात विरोधकांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला

सकाळी ११.२५ वा.
दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या संदर्भात विरोधकांनी स्थगन प्रस्ताव दिला आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी... अजून किती काळ वाट पाहणार? - जयंती पाटील 
राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ पडलाय... शेतकरी आत्महत्या करतायत... शेतकऱ्यांसाठी तत्काळ आर्थिक पॅकेजची घोषणा करा - छगन भुजबळ

सकाळी : ११.१५ वा.
विधानपरिषद कामकाज सुरू होताच काँग्रेस - राष्ट्रवादीची घोषणाबाजी पुन्हा सुरू 

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. भाजप आणि शिवसेना सत्तेमध्ये सहभागी आल्यानंतर, आता विरोधकदेखील सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची नागपूरमध्ये बैठक झाली. राज्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.