'पोरींनो आत्महत्या नको... तुमचा भाऊ पाठिशी आहे'

पोरींनो आत्महत्या करू नका... तुमचा भाऊ तुमच्या पाठिशी आहे, असं आवाहन केलंय नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी... दुष्काळग्रस्त परिस्थितीत धैर्यानं तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांनो आणि चिमुकल्यांनो त्यांचं तरी ऐका...  

Updated: Jan 22, 2016, 01:22 PM IST
'पोरींनो आत्महत्या नको... तुमचा भाऊ पाठिशी आहे' title=

पुणे : पोरींनो आत्महत्या करू नका... तुमचा भाऊ तुमच्या पाठिशी आहे, असं आवाहन केलंय नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी... दुष्काळग्रस्त परिस्थितीत धैर्यानं तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांनो आणि चिमुकल्यांनो त्यांचं तरी ऐका...  


बीडमधील विवाह सोहळा

लातूरमध्ये हुंड्यसाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्या १८ वर्षांची मोहिनी आणि हुंडयासाठी पैसे नसल्यामुळे बहिणीची सोयरिक मोडल्याचा ताण सहन न झाल्यामुळे आत्महत्या करणारा सतिश कदम... या दोन घटनांमुळे महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती आणि कितीही प्रयत्न केला तरी सुरूच असणारी हुंडा पद्धती या दोन गोष्टी प्रकर्षानं समोर आल्या. 

 

यानंतर, 'नाम' या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचवणाऱ्या नाना आणि मकरंदनं शेतकरी कुटुंबांना आवाहन केलंय. 'महाराष्ट्रातल्या मुलींना कळकळीची विनंती आहे की तुमचा भाऊ आणि पितातुल्य नाना तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही खचून जाऊन टोकाचं पाऊल उचलू नका' असं आवाहन नाम संस्थेकडून करण्यात आलंय. 

'नाम'कडून 'एक गाव, एक लग्नतिथी' हा कार्यक्रम राबवण्यात येतोय. यामध्ये सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न लावून दिले जात आहेत.