नाशिक : दिवाळीच्या दिवसांत फटके फोडताना नाशिकमध्ये दोघा मुलांच्या डोळ्याला इजा झाली.
एकदा पेटवलेला फटाका बराच वेळ झाला तरी फुटला नाही म्हणून पुढे जाऊन बघत असतानाच नेमका फटका फुटून दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. यात तालीफ युसफ खान हा ९ व्या इयत्तेत शिकणा-या मुलाच्या दोन्ही डोळ्यांना जखम झाली.
तर दुस-या घटनेत गौरव बर्डे या आठवीत शिकणा-या मुलाच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. गौरव पुणतांब्याचा रहिवासी आहे. देवळाली कँम्पला राहणारा तालीफ मित्रासोबत सुतळी बॉम्ब फोडत असताना त्याला इजा झाली. दोघांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत