दिवाकर रावतेंचा मुजोर रिक्षाचालकांना सज्जड दम

मुंबई, ठाणे, कल्याणसह इतरत्र वाढत जाणारी रिक्षावाल्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही असा सज्जड दम राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला. 

Updated: Mar 5, 2017, 04:06 PM IST
दिवाकर रावतेंचा मुजोर रिक्षाचालकांना सज्जड दम title=

कल्याण : मुंबई, ठाणे, कल्याणसह इतरत्र वाढत जाणारी रिक्षावाल्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही असा सज्जड दम राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला. 

भिवंडी-कल्याण एसटी चालकासह पोलिसांवर हात उगारण्याची घटना घडल्यानंतर त्यांनी कल्याणला भेट दिली. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आम्ही काटेकोरपणे पालन करू त्याचबरोबर एसटी कर्मचा-यांशी मुजोरपणे वागणा-यांची गय केली जाणार नाही असंही रावते यांनी ठणकावून सांगितलं. 

तसेच एसटी चालक आणि वाहतूक पोलिसांना मारहाण करणा-या रिक्षाचालकांच्या रिक्षा परिवहन मंत्र्यांच्या समक्ष तोडण्यात आल्या. कर्मचा-यांवर हात उगारला तर हेच परिणाम होतील असा इशारा यातून दिल्याचं बोललं जातंय. दरम्यान जखमी एसटी चालक भोसले याची रुग्णालयात जाऊन परिवहन मंत्र्यांनी विचारपूस केली.