संतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल

शनिवारी सकाळपासून कामावर रुजू होण्याच संपकरी निवासी डॉक्टरांनी सांगितलं असलं तरी यामुळे नाहक त्रास सोसावा लागल्यानं रुग्णांचा पारा चढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. 

Updated: Mar 24, 2017, 09:44 PM IST
संतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल title=

मुंबई : शनिवारी सकाळपासून कामावर रुजू होण्याच संपकरी निवासी डॉक्टरांनी सांगितलं असलं तरी यामुळे नाहक त्रास सोसावा लागल्यानं रुग्णांचा पारा चढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. 

अशीच एक घटना उल्हासनगरमध्येही घडली. आपलं एक वर्षाच्या आजारी असणाऱ्या लहान मुलाला डॉक्टरनी तपासून उपचार करण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या आशिष रोकडे यांनी डॉक्टर सदाफुले यांनी धमकावल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय. 

डॉक्टरांना वारंवार विनवणी करूनही डॉक्टरनी संपाचं कारण देत मुलाला तपासण्यास नकार दिल्याचं आशिष रोकडे यांच्या पत्नीचं म्हणणं आहे.

आरोपीने डॉक्टर सदाफुले यांना धमकावल्याची तक्रार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. याची दखल उल्हासनगर मेडिकल असोसिएशननं घेतली आहे.