मुंबई : 'दिलवाले' सिनेमा पाहू नये ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे मंगळवारी दुपारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिलवाले चित्रपटाला आता मनेसचा विरोध नसल्याचे स्पष्ट झालेय.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी शाहरुखने चेन्नईतल्या पूरग्रस्तांना १ कोटींची मदत केली. हे शाहरुखचे वागने मनसेला खटकले. तात्काळ मनसे चित्रपट शाखेने शाहरुखच्या आगामी 'दिलवाले' या सिनेमावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. शाहरुखचा दिलवाले पाहायला महाराष्ट्रातील जनतेने चित्रपटगृहात जाऊ नये, असे मनसेने म्हटले होते.
हा सिनेमा पाहण्याऐवजी नाना पाटेकर-मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेला द्या निधी द्या, अशी भूमिका मनसेच्या चित्रपट शाखेने घेतली होती. मात्र दिलवालेला विरोध ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे. रोहित शेटटीच्या दिलवाले चित्रपटातून शाहरुख-काजोली ही हिट जोडी पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे.
शाहरुखची 'चुपी'
दिलवाले या चित्रपटावर मनसे चित्रपट कर्मचारी सेनेने केलेल्या बहिष्काराच्या आवाहनावर शाहरूख खाननं मौन बाळगलंय. चित्रपटातलं एक गाणं रिलीज करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी एक पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शाहरुखला याविषयी प्रश्न विचारण्यात आला. पण त्यावर उत्तर देणं शाहरूखनं टाळलं.
चेन्नईतल्या पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपयांची मदत करणाऱ्या शाहरुखनं महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांना कुठलही मदत केलेली नाही. त्यामुळे शाहरुखच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचं आवाहन मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केले.