इंदापूरच्या नगरसेवकाचा भररस्त्यात खून...

इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक धनंजय वाशिंबेकर यांचा खून झालाय. 

Updated: Mar 25, 2015, 11:28 PM IST
इंदापूरच्या नगरसेवकाचा भररस्त्यात खून...  title=

पुणे : इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक धनंजय वाशिंबेकर यांचा खून झालाय. 

मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास वाशिंबेकर यांच्यावर पुणे-सोलापूर महामार्गावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात वाशिंबेकर आणि त्यांचे सहकारी महावीर लोंढे जखमी झाले होते.

वाशिंबेकर यांना तात्काळ उपचारासाठी अकलूजला हलवण्यात आलं... मात्र, तिथं त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

वाशिंबेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ इंदापूर बंद ठेवण्यात आलाय. धनंजय वाशिंबेकर यांचेवर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह सर्व पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी आणि इंदापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

२००४ साली झालेल्या सोन्या सोनटक्के खून प्रकरणातून वाशिम्बेकर यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय पोलिसांना असून हल्लेखोरांचे धागेदोरे हाती लागले आहेत, आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.