मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.

Updated: Mar 13, 2016, 08:40 PM IST
मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर title=

नागपूर: अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. बिल्डर आणि सरकारचं साटंलोटं असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. त्याला आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

ज्यांचं धोरण बिल्डर धार्जिण आहे, त्यांनी विरोध करु नये, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अनेक वर्ष कारवाईच्या भीतीनं जगणाऱ्या लाखो कुटुंबांचाही विचार करा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिला आहे.