पुणे : पन्नास दिवस त्रास सहन करा... त्यानंतर या त्रासाची तुम्हाला सवय होईल. अशा शब्दात नोटा बंदीच्या निर्णयावर काँग्रेसच्या आमदार प्रणित शिंदे यांनी टीका केली आहे.
पुणे शहर काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पन्नास दिवस त्रास सहन करा. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगितले होते. मात्र , पन्नास दिवसानंतर परीस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. असा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळं पन्नास दिवसानंतर त्रासाची सवय होईल, असं मोदी यांना म्हणायचं होतं का... असा उपरोधिक सवाल शिंदे यांनी केला आहे.
काँग्रेस या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनासाठी शिवसेनाबरोबर आली तरी आम्ही त्यांची मदत घ्यायला तयार आहेत. असं त्यानी म्हटलंय.
एटीएमच्या रांगेत मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना मदत द्यावी. बँक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा काढून टाकावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पैसे काढता न आल्याने खात्यात शिल्लक पैशांवर 18 टक्के व्याज देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
पेटीएम सारख्या कंपन्यांचे नरेंद्र मोदी ब्रॅन्ड अॅम्बेसीडर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.