कोकणवासियांसाठी खुशखबर : दादर - सावंतवाडी विशेष गाडी

कोकणवासियांसाठी एक खुशखबर आहे... दादर - सावंतवाडी ०१०९५  ही विशेष गाडी २७ मार्च पासून दर मंगळवार, शुक्रवार आणी रविवार सावंतवाडीकडे रवाना होणार आहे.

Updated: Mar 28, 2015, 09:40 PM IST
कोकणवासियांसाठी खुशखबर : दादर - सावंतवाडी विशेष गाडी title=

मुंबई : कोकणवासियांसाठी एक खुशखबर आहे... दादर - सावंतवाडी ०१०९५  ही विशेष गाडी २७ मार्च पासून दर मंगळवार, शुक्रवार आणी रविवार सावंतवाडीकडे रवाना होणार आहे.

ही गाडी दादरहून सकाळी ७.५० वाजता सुटून सावंतवाडी येथे संध्याकाळी ७.२० वाजता पोहचेल. ही विशेष गाडी केवळ ७ जूनपर्यंत चालवली जाणार आहे. 

तर, ०१०९६ सावंतवाडी - दादर ही विशेष गाडी २८ मार्च ते ८ जून या दरम्यान दर बुधवार, शनिवार आणि सोमवार या दिवशी दादरकडे रवाना होईल. ही गाडी सावंतवाडीहून सकाळी पाच वाजता सुटून दादरला संध्याकाळी ४.१० वाजता पोहचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड,  चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदूर्ग, कुडाळ आणि झारप या स्थानकावर थांबणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.