तोडफोड प्रकरणी मनसे नेते प्रकाश भोईर अटकेत

कल्याणमध्ये मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी कायदा हातात घेऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका बारमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घुसून तोडफोड केली. याप्रकरणी त्यांना अटक करुन पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Updated: Jun 5, 2015, 10:56 AM IST
तोडफोड प्रकरणी मनसे नेते प्रकाश भोईर अटकेत title=

कल्याण : कल्याणमध्ये मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी कायदा हातात घेऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका बारमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घुसून तोडफोड केली. याप्रकरणी त्यांना अटक करुन पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

गुंडा स्टाईलने बार फोडणाऱ्या शहर अध्यक्ष व माजी आमदार भोईरसह ४० जणांविरोधात बाजारपेठ पोलिसांनी सशस्त्र दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

कल्याण न्यायालयात हजर केले असता माजी आमदार प्रकाश भोईर, नगरसेवक उल्हास भोईर यांच्यासह तीन मनसे कार्यकर्त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.