नांदेडमधील दोन पंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

नांदेड जिल्ह्यात नव्याने झालेल्या नायगाव आणि हिमायतनगर दोन्ही नगर पंचायतीवर काँग्रेसचे स्पष्ट बहुमत मिळवलंय... 

Updated: Jan 11, 2016, 02:13 PM IST
नांदेडमधील दोन पंचायतींवर काँग्रेसचा झेंडा  title=

नांदेड : नांदेड जिल्ह्यात नव्याने झालेल्या नायगाव आणि हिमायतनगर दोन्ही नगर पंचायतीवर काँग्रेसचे स्पष्ट बहुमत मिळवलंय... 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाणांना घरच्या मैदानात लोळवण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले होते. मात्र अशोक चव्हाण सर्वांना पुरून उरले आणि दोन्ही नगर पंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकवला... 

नायगावमध्ये काँग्रेसला 17 पैकी 13 तर हिमायतनगरमध्ये 17 पैकी 10 जागा मिळाल्या....कोंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना शह देण्यासाठी सेना-भाजपा-राष्ट्रवादी ने महाआघाडी केली होती. मात्र अशोक चव्हाणांनी विरोधकांना चांगलीच धूळ चारली..  

नायगाव नगर पंचायत 
एकूण 17 जागा 
काँग्रेस - 13 
रा कॉ -   2 
सेना -   1 
भाजपा - 1

हिमायतनगर नगर परिषद 
एकूण 17 जागा 
कांग्रेस -10
रा -कॉ -  2
सेना -     4 
अपक्ष - 1