यवतमाळ : भाजपमध्ये सध्या इनकमिंग सुरू आहे. माजी मंत्री संजय देशमुख यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसे त्यांनी जाहीर केलेय.
काँग्रेसमध्ये द्वेषाचं राजकारण करणा-या माणिकराव ठाकरेंवर टीका करत संजय देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली. यवतमाळ जिल्हा काँग्रेसची अवस्था बिकट असून माणिकराव ठाकरे यांना घरापुरती काँग्रेस पार्टी हवी होती. तसेच काँग्रेसमधील नेते एकमेकांना पाण्यात पाहताहेत. यासाठी आपण काँग्रेस आणि माणिकराव ठाकरे यांना अडचणीचे ठरू नये म्हणून काँग्रेस सोडल्याचं संजय देशमुख यांनी सांगितले.
संजय देशमुख काँग्रेस पदाधिका-यांसह 28 जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिग्रसमधील आयोजित मेळाव्यात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.