कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत विरोधी पक्षनेतेपदावरून मोठा राडा झाला.
काँग्रेसचे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी काही दिवससांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, राणे विरोधी पक्षनेते पद सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळं विरोधी पक्षाच्या बाकांवर बसण्यावरून राणेंना काँग्रेसचे नगरसेवक नवीन सिंह, आयुब शेख, उदय रसाळ यांनी विरोध केला. त्यावरून विश्वनाथ राणे आणि काँग्रेसचे नवीन सिंग आमने-सामने भिडले.
अखेर महापौर कल्याणी पाटिल यांनी गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना महासभेच्या बाहेर काढण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले. मात्र, सुरक्षा रक्षक आणि नगरसेवक यांच्यात धक्क्बुक्की झाली आणि मोठा गोंधळ निर्माण झाला.
नगरसेवक नवीन सिंह यांनी महासभेत पिस्तूल काढल्याचा आरोप महापौरांनी केला. मात्र हा आरोप सिंह यांनी फेटाळून लावला. काँग्रेस नगर सेवकांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या मांडला.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.